
नवी दिल्ली नॉर्वेच्या टेलिनॉर या मोबार्इल सेवा पुरवणा-या कंपनीचा भारतातील व्यवसायाची मालकी भारती एअरटेल कंपनीने सुमारे ७ हजार कोटीं रूपयांना विकत घेतला असल्याची माहिती भारती एअरटेलचे प्रमुख सुनील भारती-मित्तल यांनी आज दिली. दोन कंपन्यांमधील हा व्यवहार वर्षभरात पूर्ण होर्इल, असेही त्यांनी सांगितले.
मोबार्इल सेवा देण्याच्या स्पर्धेत रिलायन्स जिओ च्या प्रवेशानंतर पराकोटीची स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकून राहणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यामुळे भारतातील आमचा विभाग आम्ही भारती एअरटेल ला विकत असल्याचे टेलिनॉर ने सांगितले. ४४ दशलक्ष ग्राहकसंख्या असलेल्या टेलिनॉरची सेवा आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांत पुरवली जाते. जिओने पुरवलेली मोफत सेवा आणि व्होडाफोन व आयडिया यांच्या विलीनीकरणाच्या चर्चेनंतर टेलिनॉरने हा निर्णय घेतला आहे
RELATED POSTS
मेट्रो ३ साठीच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाची बंदी कायम
25-02-2017
नव्या ग्रहांच्या स्वागतासाठी गुगलचे नवे डुडल !
24-02-2017
टेलिनॉर च्या भारतातील व्यवसायाची मालकी एअरटेल कडे…
23-02-2017
स्नॅपडीलचे सहसंस्थापक करणार आपल्या वेतनात १०० टक्के कपात
23-02-2017